अहमदनगर Live24 टीम,24 जुलै 2020 :- राज्यात महाआघाडीच्या सरकार स्थापनेनंतर अनेक कारणाने नाराजीनाट्य सुरूच असल्याचे दिसत आहे.
परंतु समझोता तंत्रामुळे सर्व आलबेल होऊन जाते. आता पुन्हा एकदा नाराजी नाट्य सुरु आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याचे कारणही तसेच आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी अशोक चव्हाण यांची भेट घेतली. खातेविभाजन हा मुद्दा यावेळी असणार अशी चर्चा आहे. यावे बोलताना थोरात म्हणाले, मी अशोक चव्हाण यांना भेटलो, यामध्ये काहीही नवीन नाही.
आमच्या भेटी होतच असतात. तसेच अशोक चव्हाण यांच्या खातेविभाजनचा निर्णय एकमताने घेतला जाईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
सरकारी अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचा विभाजनाचा प्रस्ताव परस्पर तयार केल्यामुळे अशोक चव्हाण नाराज झाले होते.
मंत्र्यांना न विचारता अधिकारी परस्पर प्रस्ताव तयार करत असल्याची नाराजी चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन बोलून दाखवली होती.
त्यामुळे महाविकासआघाडीत नवे नाराजीनाट्य सुरु झाले, अशी चर्चा होती. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी हे वृत्त फेटाळून लावले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा