श्रीरामपूर : सोशल डिस्टन्सच्या नियमाची पायमल्ली करणाऱ्या व्यक्ती, संस्थांवर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या सबबी सांगून काही व्यक्ती, संस्था नियम मोडत आहेत.
त्यांच्यावर लवकरच दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी दिली. शिवाजी चौकात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
देशांमध्ये कोरोना बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वरिष्ठ स्तरावरून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिकरीचे प्रयत्न होताना दिसत आहे.
बराच काळ सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करूनही काही व्यक्ती, संस्था शहरासह बेलापूर परिसरात नियम पाळत नाहीत.
पोलीस, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, महसूल अधिकारी दिवसाची रात्र करून हा विषाणू पसरू नये म्हणून जीव धोक्यात घालून प्रयत्न करीत आहेत. याचे साधे भानही नागरिकांना नाही, असाही खेद त्यांनी व्यक्त केला.
जो कोणी कायदा पाळणार नाही त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.अशा कार्यास सामाजिक संस्थांनाही पुढे यावे, असे आवाहन श्रीहरी बहिरट यांनी केले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®