नगर – सोमनार धनराज लिमकर, वय २७, रा. श्रीऱाम गल्ली मिरजगाव याचा भाऊ संतोष धनराज लिमकर याने जयकुमार याच्या मुलीसोबत प्रेमविवाह केला.
त्याच्या रागातून सोमनाथ लिमक तरुणास जयकुमार बोरा, रा. मिरजगाव, ता. कर्जत व इतर १० जणांनी इनोव्हा गाडी मॅक्स पांढऱ्या रंगाची गाडी व एक इर्टिका गाडी नंबर सांगता येत नाही.
या गाडीतून येवून बळजबरीने तोंड दाबून गाडीत बसवून पळवून नेले. गाडीत गाडीत खाली वाकवून शिवीगाळ करुन ‘तुझा भाऊ कोठे आहे’असे म्हणत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
लाथाबुक्क मारहाण केली. हा प्रकार नगर शहरातील आशा टॉकीजसमोर व नगर मिरजगावपर्यत घडला.
याप्रकरणी सोमनाथ धनराज लिमकर या तरुणाने वरीलप्रमाणे कोतवाली पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी जयकुमार व इतर १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.