भंडारदरा : -भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पाऊस सुरूच असून गुरुवारी संध्याकाळी धरण शाखेकडून प्रवरा नदीत ५७४८ क्युसेक्सने विसर्ग सुरू असून कृ ष्णवंती नदीतूनही १०२२ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.
अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सुरू झालेला पाऊस अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसल्याने भंडारदरा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा १०५०० दलघफू कायम ठेवून जादा झालेला पाणीसाठा प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे.
मध्यंतरी दोन दिवस पाऊस कमी झाल्याने पाण्याखाली गेलेली भात पिके परत तग धरू लागली होती. परंतु, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने ही भात पिके पाण्याखाली गेली असून लागवड केलेला भात सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असूनही महसूल विभागाने पंचनामे का सुरू केले नाहीत? असा प्रश्न आदिवासी शेतकऱ्यांना पडला आहे. संपूर्ण भात पीकच पाण्याखाली असल्याने पिवळे पडले आहे.
गुरुवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणावर २७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून धरणातून एकूण ५७४८ क्युसेक्सने पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे.
गत चोवीस तासात भंडारदरा येथे १०३ मि.मी. पाऊस पडला असून तोच पाऊस रतनवाडीला ११६ मि.मी. पडला तर पांजरे येथे ११० मि.मी., वाकी ९७ मि.मी., घाटघर ७२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून कृ ष्णवंती नदी १०२२ क्युसेक्सने वाहत आहे.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख