विखे समर्थक भाऊसाहेब कांबळेंच्या बॅनरवरुन विखेंचाच फोटो गायब

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते शिर्डी मतदारसंघातील श्रीरामपूर इथे प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं.यावेळी बॅनरवरुन विखेंचा फोटो गायब होता. विखे समर्थक असलेले भाऊसाहेब कांबळे शिर्डी लोकसभेचे उमेदवार आहेत.

पण विखे समर्थक असलेल्या भाऊसाहेब कांबळेंना थोरातांची साथ मिळाल्याचं चित्र आहे.

अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. पण या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीला गटबाजीचं ग्रहण लागलंय.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात विखे-थोरात वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा फोटो बॅनरवरुन गायब करण्यात आलाय.

काँग्रेसचे स्टार प्रचारक असतानाही त्यांचा फोटो डावलल्याने थोरात गटावर विखे गटाने नाराजी व्यक्त केली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपने त्यांना दक्षिण नगरची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथे सुजय विखे विरुद्ध राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांच्यात लढत होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment