भाऊसाहेब कांबळेंचा सेना प्रवेश लांबणार ?

Ahmednagarlive24
Published:

श्रीरामपूर : भाऊसाहेब कांबळे यांच्या शिवसेना प्रवेशाची तारीख 5 सप्टेंबर निश्चित झाली असली तरी शिवसेनेमधील अंतर्गत विरोधामुळे हा प्रवेश लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शहराध्यक्ष सचिन बडदे हे कांबळे यांना मातोश्रीवर घेऊन गेले. हा निर्णय घेताना कमालीची गुप्तता पाळण्यात आली. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आ. नरेंद्र दराडे, खा. सदाशिव लोखंडे यांनाही याबाबत कुठलीही माहिती नव्हती.

अचानकपणे घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे खेवरे विरोधी गट सक्रीय झाला आहे. त्यामुळे भाऊसाहेब कांबळे यांचा सेना प्रवेश लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाले तर कांबळे यांच्यापुढील अडचणी वाढणार आहेत.

भाऊसाहेब कांबळे यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर नाराज शिवसैनिकांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात सह्यांची मोहीम सुरू केली असल्याची माहिती तालुकाप्रमुख राजेंद्र देवकर यांनी दिली.

यासंदर्भात खा. सदाशिव लोखंडे व आ. नरेंद्र दराडे यांची भेट घेतली. तसेच यासंदर्भात शिवसैनिकांच्या नाराजीबाबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत कांबळे यांना होम ग्राऊंड वर 23000 मते कमी पडली आहेत. त्यामुळे कांबळेंना प्रवेश देण्यात यावा मात्र उमेदवारी देण्यात येऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment