अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- जामखेड शहरात राळेभात बंधू यांच्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती. यातील आठ आरोपी अगोदरच जेरबंद करण्यात यश मिळाले होते.
पण सात महिन्यांपूर्वी अंतरिम जामीन नामंजूर झाल्यापासून फरार असणारा आरोपी विजय ऊर्फ काका गर्जे यास जामखेड पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करून पकडले.
शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास चार दिवस पोलिस कोठडी दिली. दोन वर्षांपूर्वी शहरातील बीड रोडवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
प्रवेशद्वारासमोरील एका हाॅटेलमध्ये शनिवारी बाजार दिवशी सायंकाळी पाच वाजता राकेश राळेभात व योगेश राळेभात यांची हत्या करण्यात आली होती.
काही दिवसांतच हत्याकांडाशी संबंधित जामखेडचे माजी सरपंच कैलास मानेसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती. तसेच हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड व इतर चार जणांना एका महिन्यात अटक करण्यात आली होती.
या हत्याकांडात काका गर्जे यांचेही नाव होते. तो फरार होता. सात महिन्यांपूर्वी त्याचा अंतरिम जामीन नामंजूर झाल्यापासून तो फरार होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com