BIG BREAKING : प्रसिद्ध हिंदी अभिनेते इरफान खान यांचं निधन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 , 29 एप्रिल 2020 :- प्रसिद्ध हिंदी अभिनेते इरफान खान यांचे आज मुंबईतील रूग्णालयात निधन झाले, 53 वर्षीय अभिनेता 2018 पासून कर्करोगाशी झुंज देत होता.

कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. काल त्याला प्रकृती अस्वाथामुळे  कोलिकाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

बॉलिवूड अभिनेता इरफान खान दीर्घ काळापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर नावाच्या आजाराशी झुंज देत होता,काल इरफानची प्रकृती अचानक बिघडली, त्याला तातडीने हॉस्पीटलमध्ये भर्ती करण्यात आले होते.

इरफान खान यांनी लंडनमध्ये कॅन्सरवर यशस्वी उपचार घेतले होते. त्यानंतर भारतात परल्यावर अचनक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अलीकडेच त्याच्या आईचे जयपूरमध्ये निधन झाले आणि त्याला लॉकडाऊनमुळे जयपूरमध्ये आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होता आले नाही. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे इरफानने आपल्या आईचे अंत्यदर्शन घेतले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment