बिग ब्रेकिंग : त्या खून प्रकरणातील पाच संशयित ताब्यात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापूरफाटा येथे आलेल्या जळगाव जिल्ह्यातील अज्ञात व्यक्तींनी ‘सोने’ देणाऱ्या चौघांना गुरुवारी धारदार शस्त्राने ठार केले.

यातील पाच संशयितांना गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शनिवारी पहाटे पुण्यात ताब्यात घेतले. कोट्यवधी किमत असलेले गुप्तधन अवघ्या काही लाखांत घेण्यासाठी जळगावचे लोक आले होते.

आपली फसवणूक होण्याच्या शक्यतेने ते हत्यारबंद होते. बनावट सोने देणारे आणि खरेदी करणाऱ्यांत मारामारी होऊन सुरेगाव येथील नातीक कुंजीलाल चव्हाण (४० ), नागेश कुंजीलाल चव्हाण (१६ ),

श्रीधर कुंजीलाल चव्हाण (३५) आणि देऊळगाव सिद्धी येथील लिंब्या हब्र्या काळे (२२) यांचा खून झाला. घटनास्थळी पाकीट व पर्समध्ये आरोपींचे ओळखपत्र मिळाले.

स्वस्त सोने देणाऱ्या नातेवाईकांकडेही आरोपींचे मोबाइल नंबर मिळाले. एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, श्रीगोंद्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,

बेलवंडीचे निरीक्षक अरविंद माने आदींनी नगर, नाशिक, जळगाव, पुणे येथे विविध पथके पाठवली. पुण्यात पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment