अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- माजी आमदार अनिल राठोड यांच्या कुटुंबातही करोनाचा शिरकाव झाला आहे. श्री. राठोड यांच्यासह कुटुंबातील चौघांना करोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा उपद्रव वाढत चालला आहे. शहराचा मध्य भाग असलेल्या चितळे रोड, नेता सुभाष चौक परिसरातही करोना रुग्ण आढळून आलेले आहेत.
याच परिसरात शिवसेना उपनेते अनिल राठोड यांचे संपर्क कार्यालय आहे. दरम्यान, उपनेते राठोड यांना फ्लूसदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी रविवारी स्वॅब दिले होते.
त्याचा अहवाल काल (सोमवार) रात्री येऊन उपनेते राठोड, त्यांची पत्नी तसेच मुलगा व सून अशा चौघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. सोमवारी रात्रीच या चौघांनाही शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा