अहमदनगर Live24 टीम,17 ऑगस्ट 2020 :- सर्वांच्या बरोबरीने सरकार सक्षमपणे काम करत आहोत. रुग्णवाहिका मोफत ठेवल्या आहेत, स्त्राव तपासणी किंमती कमी केल्या आहेत.
अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अधिकार देण्यात आले आहेत. लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल. आता लॉकडाऊन करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही.

टप्प्याटप्याने सगळे क्षेत्र सुरू करणार आहोत अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिली. कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथील आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून
सुरू करण्यात एक हजार रूग्ण बेडची क्षमता असणाऱ्या शरदचंद्र पवार कोविड सेंटरचे उद्गाटन डॉ. टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
पारनेर मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके हे आपल्या उपक्रमशील स्वभावाने परिचित आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार जसा तालुक्यात व्हायला लागला तसा त्यांनी आपल्या मदतीचा ओघही वाढवला.
आता त्यांच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून टाकळी ढोकेश्वर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात 1000 बेडचे सुसज्ज अद्ययावत कोव्हिड केअर सेंटर उभे करण्यात आले आहे.
स्वखर्चातून उभे राहणारे अशाप्रकारचे हे राज्यातील पहिलेच कोव्हिड सेंटर ठरणार आहे. याचे उद्गाटन डॉ. टोपे यांच्या हस्ते झाले.
यावेळी लंके यांनी तालुक्यातील ढवळपुरी, चोंभुत, पळवे, गुणोरे, अस्तगाव येथील प्रलंबित प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीबाबत, सुपे येथे ट्रामा सेंटर, कामगार रूग्णालय यासंह अन्य मागण्या टोपे यांच्याकडे केल्या.
यावेळी टोपे यांनी आमच्या पक्षाशी व समाजाशी बांधिलकी आहे. आमचा राजकारणापेक्षा समाजकारणावर भर आहे. हे कोविड सेंटर देखील याचे घोतक आहे.
सुपे येथे औद्योगिक वसाहतीकरीता कामगार रूग्णालयाचा विचार करू. पारनेर तालुक्यातील प्रलंबित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रस्तावांना मंजुरी देऊन तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला चालना देणार असल्याचे आश्वासन दिले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













