बिग ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये टळली पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पालघर मध्ये साधूंचे हत्याकांड गैरसमजुतीतून झाले होते, पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती अहमदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली  आहे.

नगर तालुक्यातील विळद येथेही गुरुवारी रात्री असाच प्रसंग तिघा मजुरांवर ओढवला. नरबळीच्या संशयातून संतप्त झालेल्या जमावाने महिलेसह इतर दोघांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला चढविला. 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पवन सुपनर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जमावाला रोखून चौघांची त्यांच्या तावडीतून सुटका केली.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, ही महिला तिच्या प्रियकर व मुलासह विळद गावातील वस्तीवर अशोक वराळे यांच्या घरी भाड्याने रहाते.

या घराशेजारी टॉयलेट बांधण्यासाठी एक शोषखड्डा खोदलेला होता. चार-पाच पाच दिवसांपासून तीन अनोळखी वस्तीवर येऊन राहत असून त्यांच्याकडे एक मुलगा आहे. अशी चर्चा विळद परिसरात सुरू झाली.

‘नरबळीचा काहीतरी प्रकार आहे’ अशा चर्चा आणि अफवांना उधाण आले. या अफवा आणि गैरसमजुतीतूनच गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास लाठ्या-काठ्या घेऊन जमाव विळद येथील वस्तीवर मजूर राहत असलेल्या घराजवळ येऊन धडकला.

दरम्यान ही घटना गावात सर्वत्र पसरली. या घटनेबाबत काही ग्रामस्थांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली.यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पवन सुपनर व पोलीस नाईक परशुराम नाकाडे हे दोघे जण तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

यावेळी संतप्त झालेल्या जमावाला सुपनर व नाकडे यांनी शांत केले.त्यानंतर जमावाची खात्री पटली आणि वातावरण शांत झाले.

पदरात दोन वर्षाचा गोजिरवाना मुलगा असताना सासरी नवरा छळत असल्याने‘ती’ महिला रोजीरोटीसाठी प्रियकरासोबत नगरमध्ये आली होती.येथे तिच्यावर तिच्याच मुलाचा नरबळी देण्याचा आरोप झाला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment