मोठी बातमी : आमदार निलेश लंके यांनी घेतला ‘हा’ निर्णय म्हणाले यापुढे ….

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- गरीब विद्यार्थी शिकण्याची इच्छा असूनही पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून होणारे सत्कार स्वीकारण्यास माझे मन धजावत नाही.

त्यामुळे यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये, सत्कार करायचाच असेल तर अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करा, असं आवाहन पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी केलं आहे. लोकप्रतिनिधी म्हटले की, कार्यक्रमात त्यांचा आदर सत्कार, हारतुरे, फेटे असा जामानिमा असतो.

आमदारांची योग्य सरबराई करण्यात आयोजक अजिबात कसर सोडत नाही. पारनेरचे आ.निलेश लंके यांनी मात्र यापुढे असे सत्कार स्विकारणार नसल्याचं जाहीर केले आहे. सत्काराऐवजी गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांना, रूग्णांना मदत करा, असं आवाहन त्यांनी केले आहे.

फेसबुक पोस्ट वर त्यांनी म्हटले आहे की, मी मतदार संघात कोठेही सत्कार स्वीकारणार नाही असे जाहीर आवाहन केले होते त्याला कारणही तसेच आहे! अनेक गरीब विद्यार्थी शिकण्याची इच्छा असूनही पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाही!अशा परिस्थिमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून सत्कार स्विकारण्यास माझे मन धजावत नाही!त्यामुळे यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये!सत्कार करायचाच असेल तर गरजू विद्यार्थी यांना मदत करा!सत्कार करायचाच असेल

तर वृद्धांना काठी वाटप करा!सत्कार करायचाच असेल तर गरिबांना हॉस्पिटलसाठी आर्थिक मदत करा!सत्कार करायचाच असेल तर अंध अपंगांना मदत करा!हाच माझा सत्कार मी समजेल! माझ्या या आहावानाला प्रतिसाद देत आज गोरेगावच्या नरसाळे परिवार व जमगाव येथील वाघ परिवाराने आपल्या पाल्याच्या शुभविवाह समारंभ प्रसंगी सत्काराला फाटा देत!निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने सुरू असलेल्या

मा.शरदचंद्र पवार साहेब आरोग्य मंदिरासाठी रक्कम.११,०००/- रुपये धनादेश दिला!कर्जुले हरेश्वर येथील माझे सहकारी श्री.दत्ता शिर्के यांनी त्यांच्या हॉटेल उदघाटन समारंभ प्रसंगी सत्काराला फाटा देत गरीब मुलाना चपला वाटप केल्या!वडनेर बुद्रुक (वाजेवाडी) येथील माझ्या प्रतिष्ठानच्या व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांनी वृद्ध नागरिकांना काठी वाटप व शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप केले!त्याबद्दल मी प्रथमतः त्या सर्वांचा ऋणी आहे!

आपल्या सर्वांकडून भविष्य काळात सुद्धा अश्याच पद्धतीने कार्य घडो हीच माता वैष्णदेवी चरणी प्रार्थना!आपण करत असलेले सामाजिक काम हाच माझ्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान मी सदैव समजतो! अशा भावना आ.लंके यांनी सोशल मिडिया पोस्ट द्वारे मांडल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved