अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- देशभर कोरोनाचे संक्रमण अद्यापही कायम आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या 76 लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच या महामारीमुळे आतापर्यंत लाखाहून अधिकांचा देशात मृत्यू झाला आहे.
कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लस शोधण्याचे काम सुरु आहे. यातच लसीकरणासंदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन घोषणा केली होती की, देशातील प्रत्येक नागरिकास राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानातंर्गत हेल्थ कार्ड देण्यात येईल.
आता दोन महिन्यांनी पंतप्रधान मोदींनी पुन्हा ‘लसीकरण सुनिश्चित करण्यासाठी डिजिटल हेल्थ आयडी वापरला जाईल’ असे संकेत दिले आहेत.
ग्रॅन्ड चॅलेंज’ च्या वार्षिक सभेला संबोधित करताना आपल्या उद्घाटन भाषणात मोदींनी सांगितले की, कोरोनाची लस तयार करण्याच्या बाबत भारत पुढे असून, काही लशींच्या चाचण्या शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत.
डिजिटल हेल्थ कार्डसोबत डिजिटल नेटवर्कचा वापर करण्यासाठी एका वितरण प्रणालीवर काम केले जाईल. त्यामार्फत नागरिकांचे लसीकरण करण्यात येईल.
मोदींनी सांगितले होते की, ”प्रत्येक भारतीयाला एक हेल्थ कार्ड दिले जाईल. हे कार्ड प्रत्येक भारतीयांच्या आरोग्य खात्याप्रमाणे काम करेल.
या कार्डमध्ये तुमची प्रत्येक चाचणी, आजार, कोणत्या डॉक्टरकडून कोणतं औषध घेतले आहे, त्याचे उपचार केव्हा घेतले, त्याचे रिपोर्ट काय आले ही सर्व बाबींचा समावेश असेल. डॉक्टरांचा वेळ घेणं, पैसे जमा करणे,
दवाखान्यात प्रिस्क्रिप्शन मिळवण्यासाठी गर्दी असो, या सर्व समस्या नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या माध्यमातून अनेक समस्यांपासून लांब राहता येईल. तसंच प्रत्येक नागरिक उत्तम आरोग्यासाठी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असेल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved