अहमदनगर Live24 टीम ,22 जून 2020 : नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाच्या वैष्णवी सोमनाथ आरगडे(वय 9 वर्षे) या अल्पवयीन मुलीचा खून केल्याची कबुली मयत मुलीचा आते भावानेच दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे,
ही माहिती अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी दिली. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार,अपर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे,उप अधीक्षक मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनी सोमवारी दिवसभर आरोपींना शोधण्यासाठी पराकाष्ठ केली.
शेवटी त्यांनी सौंदाळा येथे मामाकडेच राहत असलेला आणि या घटनेत सुरुवाती पासूनच संशयित असलेला मयत मुलीच्या आत्याचा मुलगा आप्पासाहेब नानासाहेब थोरात (वय 22 वर्षे) मूळ रा.आपेगाव,ता.पैठण
याला एलसीबीच्या विशेष पथकाने चांगलाच पोलीसी खाक्या दाखविला असता त्याने वैष्णवीचा खून केल्याची कबुली दिली. त्याने खुनाची कबुली दिली असली तरी खुनाचे कारण व त्यामागील हेतू अद्याप स्पस्ट झालेला नाही.
याबाबत अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.दीपाली काळे म्हणाल्या,वैष्णवीच्या मृत्यू हा सर्पदंशाने झालेला नसून तो घातपात आहे याचा संशय पोलिसांना होता.
शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आल्याने तो खून असल्याचे स्पष्ट झाले.मयत मुलीचे आई-वडील ,मोठी बहीण व त्यांचे कडेस आयटीआय मध्ये शिक्षण घेण्यासाठी राहत असलेला आते आते भाऊ यांच्याकडे आम्ही संशयित म्हणून चौकशी करत होतो.
त्यात वैष्णवीच्या आते भाऊ आप्पासाहेब नानासाहेब थोरात (वय 22 वर्षे) रा.आपेगाव,ता.पैठण यानेच हा खून केल्याची कबुली दिली आहे.
त्याला अटक करण्यात आली असून या खुना मागे त्याचा काय हेतू होता आणि आणखी कोण कोण यात सामील आहे याचा तपास आम्ही करत आहोत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews