शिक्षक पती-पत्नी एकत्रीकरणाबाबत पालकमंत्र्यांचे मोठे विधान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :-  सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरु झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात कोरोनारुग्णांनी अडीच हजारांचा टप्पा ओलांडला आहे.

याच पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी आलेल्या पालक मंत्री हसन मुश्रीफ यांनी पती-पत्नी एकत्रीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

या प्रतीक्षेत शिक्षकांना पुढील वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. शिक्षकांच्या बदल्यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेबाबत पालकमंत्री मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले,

जिल्ह्यांतर्गत, बाहेरून जिल्ह्यात येऊ इच्छिणारे आणि एकल शिक्षकांच्या बदल्यांसंदर्भात बर्‍याच तक्रारी आल्या होत्या. या सर्वांचा विचार करून पाच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा समावेश असलेला एक अभ्यासगट नियुक्त करण्यात आला होता.

त्यांनी सर्व परिस्थितीची माहिती घेऊन, अभ्यास करून एक अहवालही सादर केला. मात्र त्याचवेळी कोरोनाचा कहर सुरू झाल्याने त्यावर कोणताही निर्णय घेता आला नाही. त्यामुळे पती-पत्नी एकत्रीकरण आणि इतर बदल्या पुढील वर्षी करण्यात येतील.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment