अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : कोरोना संशयित म्हणून २० लोकांचे स्वॅब कोपरगाव येथील कोविड रुग्णालयात पाठवण्यात आले होते. त्यापैकी १८ रुग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. दोघांची कोरोना तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला.
काल (शनिवार) आणखी २१ जणाांचे स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर म्हणाले, शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालात कोरोनाग्रस्त डॉक्टर यांच्या दवाखान्यातील नर्स व मुंबईच्या जावयाचा मुलगा हे दोघेही कोरोनाग्रस्त आढळून आले.
त्याचबरोबर डॉक्टर कुटुंबीयांच्या व मुंबई जावयाच्या संपर्कात आलेल्या आणखी २१ जणांचे स्वॅब शनिवारी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews