बोठेच्या अटकपूर्व जामिनावर आज होणार निर्णय

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-  ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षासह आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत निर्णय राखून ठेवला आहे. न्यायालय आज निर्णय देणार आहे. दरम्यान रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणात बाळ बोठे याचे नाव मुख्य सूत्रधार म्हणून पुढे आल्यानंतर तेंव्हापासून तो फरारच आहे.

त्याच्या मागावर पोलिस पथके आहेत. हा हत्याकांड प्रकरणावर न्यायालयात दोन्ही पक्षाच्या वतीने युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आज न्यायालय काय निकाल देणार आहे , याची सर्वाना उत्सुकता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe