नोएडा :- कोरोनाचा संसर्ग होण्याच्या भीतीने ल्युडो खेळताना खोकणाऱ्या २५ वर्षीय युवकावर त्याच्या सहकाऱ्यानेच गोळी झाडली.
ग्रेटर नोएडाजवळच्या दयानगर गावात मंगळवारी रात्री ९ वाजता घडलेल्या या घटनेने युवक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
जखमी युवकाचे नाव प्रशांत सिंग आहे. रात्री मंदिरात चौघे जण ल्युडो खेळत असताना प्रशांतला खोकला लागला. यावेळी इतर तीन सहकाऱ्यांपैकी जयवीर सिंग नामक व्यक्तीने का खोकतोय, म्हणत प्रशांतला शिवीगाळ केली.
त्यातून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर जयवीरने स्वत:कडील पिस्तुलाने प्रशांतवर गोळी झाडली. यात जखमी झालेल्या प्रशांतला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर आरोपी फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®