ब्रेकिंग – अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक पार, आणखी 4 जण पाॅझिटिव्ह

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने  शतक पार केले आहे, आज जिल्ह्यात ०४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 103 झाली आहे.

आज नव्याने सापडलेल्या रुग्णांत घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी कोरोना बाधित असून इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील रुग्ण आहेत. 

दरम्यान आज जिल्ह्यातील ०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.

पाथर्डी आणि संगमनेर येथील प्रत्येकी ०१ तर सारसनगर येथील ०२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून आतापर्यंत एकूण ५८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

अहमदनगर कोरोना अपडेट – Ahmednagar Corona Updates

जिल्ह्यात आतापर्यंत ०९ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद (०७ अहमदनगर + ०२ मुंबई)

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या  ;- १०३

(महानगरपालिका क्षेत्र १८, अहमदनगर जिल्हा ५०, इतर राज्य ०२, इतर देश ०८ इतर जिल्हा २५)

जिल्हयातील अॅक्टीव केसेस ३७ (+03 नाशिक)

जिल्ह्यातील रुग्ण मृत्यू दर ८.७३ टक्के

एकूण स्त्राव तपासणी २२३७

निगेटीव  –  २०३६ रिजेक्टेड – ०२५ निष्कर्ष न निघालेले – १५ अहवाल बाकी – ५५

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment