अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : अकोले तालुक्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करत १५ लाख १७ हजारांचा मुद्देमाल रविवारी सकाळी जप्त करण्यात आला.
जाचकवाडी फाट्याजवळ बोटा (तालुका संगमनेर) ते बेलापूर ररस्त्यावरून जाणारा डंपर (एमएच १७ बीडी ५५९४) पकडण्यात आला. त्यात साडेतीन ब्रास वाळू होती.
चालक माउली गोपाळ आभाळे (वय ३२, अकलापूर, तालुका संगमनेर) हा डंपरमालक अविनाश रोहिदास डोंगरे (मुंजेवाडी, तालुका संगमनेर) याच्या सांगण्यावरून बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करत असल्याचे आढळले.
१७ हजार ५०० रुपये किमतीच्या साडेतीन ब्रास वाळूसह १५ लाख किमतीचा डंपर असा एकूण १५ लाख १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कॉन्स्टेबल कुलदीप किशोर पर्वत यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अकोले पोलिस ठाण्यात माउली आभाळे व अविनाश डोंगरे यांंच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी वाहन जप्त करून चौकशीसाठी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार टोपले करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews