अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यात आणखी ०२ जण कोरोना बाधीत असल्याची माहिती समोर आली आहे.
जामखेड येथील काही दिवसापूर्वी मृत्यू पावलेल्या बाधीत व्यक्तीच्या २९ आणि ३६ वर्षीय मुलांना कोरोनाची लागण झाली आहे.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ३१ झाली असून पैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.
तर आतापर्यंत १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®