अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- जम्मू काश्मीर राज्यातील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी हल्ला झाला.श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.
श्रीनगरपासून काही अंतरावर असलेल्या लावापोरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी शोधमोहीम हाती घेतली होती.
सुरक्षादलांनी हाती घेतलेल्या शोधमोहिमेदरम्यान अचानक एके ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली.दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. तसेच संपूर्ण रात्रभर दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू होता.दहशतवादी आणि भारतीय सैन्य दोन्हीकडूनही जोरदार हल्ला चालू होता.
घटनास्थळी झालेल्या यचकमकीत तीन दहशतवादी मारले गेले असून, त्यांची ओळख पटवली जात असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, चकमकीवेळी काही युवकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. ही दगडफेक थांबवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved