अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. यात सामान्य नागरिकांपासून बडे बडे राजकीय नेतेही याला अपवाद राहिलेले नाहीत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका कोरोनाच्याविळख्यात आहे.
साईनगरी शिर्डीही याला अपवाद राहिलेली नाही. शिर्डीमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. काल शिर्डीमधील दोन माजी उपनगराध्यक्ष बाधित आढळून आले आहेत.
आता शहरातील कोरोना बाधितांची संख्या 104 वर जाऊन पोहचली आहे. या दोन्ही माजी उपनगराध्यक्षांनी खासगी प्रयोगशाळेत आपले घशातील स्त्राव नमुने देऊन तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.
शहरातील एक माजी नगरसेवक बाधित आढळून आल्यानंतर लगेचच माजी नगराध्यक्ष आणि आता पुन्हा दोन माजी उपनगराध्यक्ष कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने राजकीय मंडळीत खळबळ उडाली आहे.
शहरात नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या शतकापार झाली असताना देखील शहरात नागरिकांची सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी होण्यास तयार नाही. परिणामी कोरोनाचा विळखा आटोक्यात येण्यास तयार नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा