निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- ऊस व दुध व्यवसाय शाश्‍वत उत्पादनाचे साधन आहे. शेतकर्‍यांनी एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. थोरात कारखान्याने ऊस गाळपाची विक्रमी कामगिरी केली.

संगमनेर तालुका सुजलाम – सुफलाम करण्यासाठी लाभक्षेत्रात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ गळीत हंगाम सांगता समारंभात मंत्री थोरात बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे,

महानंदचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, लक्ष्मण कुटे, इंद्रजित थोरात, गणपत सांगळे, अमित पंडित, सभापती शंकरराव खेमनर, सुनंदा जोर्वेकर,

नवनाथ अरगडे, रामदास वाघ, आर. एम. कातोरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यावेळी उपस्थित होते. थोरात कारखान्याने यावर्षी १९२ दिवसांत विक्रमी १३ लाख १९ हजार टनाचे गाळप केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe