अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोरोना हा संसर्ग विषाणू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तो फैलावत चालला आहे. आता तो ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फैलावला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
जगात व आपल्या देशात यावर औषध तयार करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु आजपर्यंत त्याचा शोध लागला नाही. गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी आयुर्वेद शास्त्राची निर्मिती झाली आहे.
आयुर्वेद हे विविध आजारांवर गुणकार असल्यामुळे नागरिकांनी आयुर्वेद वस्तुचा वापर मोठ्यात मोठ्या प्रमाणात करुन आपल्या आरोग्याची काळज घ्यावी.
बुऱ्हाणनगर येथे कोरोना संसर्ग विषाणुचे रुग्ण आढळल्यामुळे ३१ जुलैपर्यंत गाव लॉकडाऊन करण्यात येणार आहे. आयुर्वेद व्यासपीठ,
महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन व प्रभा आयुर्वेद व बुऱ्हाणनगर येथील विश््वंभरा प्रतिष्ठानच्यावतीने नागरिकांना गुळवेल व आयुष काढाचे ३00 नागरिकांना वाटप करण्यात आले.
डॉ. महेश मुळे व डॉ. अंशु मुळे हे सामाजिक भावनेतून समाजामध्ये कोरोना संसर्ग विषाणूवर मात करण्यासाठी आयुर्वेद शास्त्राचा अभ्यास सांगण्याचे काम करत आहे.
या काळामध्ये प्रत्येक सामाजिक बांधिलकी जपावी, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.बुऱ्हाणनगर येथे आयुर्वेद व्यासपीठ,
महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन व प्रभा आयुर्वेद व विश्वंभरा प्रतिष्ठानच्यावतीने नागरिकांना गुळवेल व आयुष काढाचे ३00 नागरिकांना वाटप करताना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले,
डॉ. महेश मुळे, डॉ. अंशु मुळे, अण्णा कचरे, साहेबराव चेमटे, रामेश्वर चेमटे, मलू वाघ, गणेश वारुळे, शंकर आंबेकर, जयराम वाघ उपस्थित होते.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]