अहमदनगर लाईव्ह24 टीम / सिंधुदुर्ग :- जिल्ह्यातील आंबोली घाटामध्ये ‘बर्निंग कार’चा थरार पाहण्यास मिळाला. दुर्दैवी या घटनेत कारचालकाच्या पत्नीचा जळून मृत्यू झाला आहे. तर पती थोडक्यात बचावला.
दुंडाप्पा पद्मनावर हा बेळगावच्या पिरनवाडीचा रहिवासी आहे. दुंडाप्पा आपल्या पत्नीसह आंबोलीवरून सावंतवाडीच्या दिशेने वॅग्नार कारने जात होता.
त्यावेळी कार अपघातग्रस्त झाल्यानंतर पेट घेतल्याने जळून खाक झाली. गाडीने पेट घेतल्यानंतर दुंडाप्पाने गाडीतून उडी घेतली तर पत्नी सीटबेल्ट लावले असल्यामुळे तिला स्वतःच्या प्राण वाचवता आला नाही.
गाडी संरक्षक कठड्याला धडकल्यानंतर पूर्णपणे जळून खाक झाली. तत्पूर्वी या गाडीने चौकुळ कुंभावडे इथं सत्यप्रकाश गावडे यांच्या कारला धबधब्याच्या अलीकडे धडक दिली होती. या धडकेनंतर घाबरून पळून जात असताना गाडीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याचं दुंडाप्पाच्या लक्षात आलं नाही.
तोपर्यंत चालत्या गाडीने पेट घेतला होता. या परिस्थितीत दुंडाप्पाने गाडीच्या बाहेर उडी मारली असता आगीच्या झपाट्यात आला आणि भाजला होता. गाडीतून उडी मारल्यानंतर गाडी समोरील संरक्षक कठड्याला जाऊन आदळली तोपर्यंत गाडीने पूर्ण पेट घेतला होता,
आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, त्याच्या पत्नीला वाचवणे शक्य नव्हतं. त्यामुळे त्याची पत्नी अक्षरश: जळून खाक झाली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com