‘ह्या’ तालुक्यात उद्यापासून व्यवसाय होणार पूर्ववत

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. नेवासे तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत.

शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शंभरी गाठली आहे. त्यामुळे नेवासे शहरात जनता कर्फ्यू लागू केला होता. आता कर्फ्युला मुदत वाढ द्यायची का,

की व्यवसाय सुरू करायचे या बाबत निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन नगरपंचायत प्रांगणात करण्यात आले होते. चर्चेअंती सोमवारपासून शहरातील दुकाने सकाळी नऊ ते पाच या वेळेत उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी सांगितले की, रुग्णांची संख्या पाहता शहरात जनता कर्फ्युचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला होता.

आज ही जनता कर्फ्युची मुदत वाढवण्याबाबत बैठकीमध्ये उपस्थित नागरिक व व्यावसायिक यांनी सोमवार पासुन व्यवसाय सुरू करावे असा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात १२ हजार पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी १० हजार ८१ रुग्ण बरे होऊन परतले आहेत. तर १५३ मृत्यू झाले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe