नरभक्षक बिबट्या लवकरच जेरबंद होईल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील मढी, केळवंडी, करडवाडी या तीन गावांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात लहान दोन मुले व एका मुलीचा बळी गेला आहे. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पुन्हा अशी घटना या परिसरात होऊ नये म्हणून वनमंत्र्यांनी नाशिक औरंगाबाद आणि जळगाव येथून नरभक्षक बिबट्याला पकडणारे तीन पथक सर्व यंत्रणेसह पाथर्डी तालुक्यात रवाना केली आहेत.

लवकरच बिबट्या जेरबंद करण्यात येईल, असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. गुरुवारी सायंकाळी सार्थक बुधवंत या चार वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याने यात सार्थकचा मृत्यू झाला.

शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख अंकुश चितळे, युवासेना तालुका अध्यक्ष अनिल रांधवणे, तालुका उपप्रमुख भारत वाढेकर, सुनिल पालवे,

जायभाय तालुका संघटक राजेंद्र म्हस्के, सुनील तांबे डॉ. गव्हाणे यांनी बुधवंत कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी जिल्हाप्रमुख दळवी म्हणाले

शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री दादा भुसे यांनी वनमंत्री संजय राठोड यांच्याशी फोनवरून संपर्क करून मढी केळवंडी करडवाडी येथील घटनेची त्यांना सविस्तर माहिती दिली असून यानंतर या तालुक्यात अशी घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याचे कळवले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment