अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- रियाविरोधात पाटणा येथे सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केली होती. याच प्रकरणाची कारवाई ही पाटण्याऐवजी मुंबईतून केली जावी अशी मागणी करणारी याचिका तिनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.
बिहार सरकारने दाखल केलेली एफआयआर योग्य असून बिहार सरकारला तपासाचा अधिकार असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. 14 जून रोजी मुंबईतील राहत्या घरी सुशांत सिंह राजपूत मृत अवस्थेत आढळला होता.

त्याच्या मृत्यूप्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढत गेल्याचे पाहायला मिळाले. हत्या की आत्महत्या? असा प्रश्न चर्चेत आला. दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांनी बिहारमधील पटना
येथे सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती ही आपल्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची तक्रार नोंदवली. मुंबईतील घडलेल्या घटनेचा बिहारमध्ये गुन्हा
नोंद झाल्यानंतर बिहार पोलिस विरुद्ध मुंबई पोलिसच नव्हे तर दोन्ही राज्यातील सरकारमध्ये ही संघर्षमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved