अहमदनगर: जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांच्या सभापती पदासाठी आरक्षण सोडत आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे काढण्यात आली.
जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली आहे. कोणत्या पंचायत समितीला कुणाचे आरक्षण येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

एकूण 14 पंचायत सभापती आरक्षण पुढील प्रमाणे
1 पारनेर : खुला प्रवर्ग
2:कोपरगाव : अनुसूचित जाती महिला
3.नगर तालुका : खुला प्रवर्ग महिला
4.श्रीगोंदा : अनुसूचित जाती
5:राहुरी : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
6.पाथर्डी :नागरिकांचा मागास प्रवर्ग
7.कर्जत : खुला प्रवर्ग महिला
8.जामखेड : अनुसूचित जमाती
9:नेवासा : खुला प्रवर्ग
10.श्रीरामपूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
11.अकोले : नागरिकांचा मागास प्रवर्ग
12.संगमनेर : खुला प्रवर्ग महिला
13.राहाता : खुला प्रवर्ग महिला
14:शेवगाव : खुला प्रवर्ग













