अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- नगर शहरात करोनाचा पादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सिव्हिल आणि खासगी लॅबमध्ये कोरोना चाचणीसाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, प्रशासनातील सावळा गोंधळ सुरु असल्याने उपचारा अभावी लोकांना ताटकळत आहे.
आता आरोग्यविभागाला कोण निगेटिव्ह अन पॉझिटिव्ह कोण याचा मेळ बसेना. सावेडीतील 46 वर्षाची महिलाही कोरोना चाचणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली.
सकाळीच चेक केलेला खासगी लॅबचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर काही वेळातच सिव्हीलमधून पॉझिटिव्ह रिपोर्ट बाहेर पडला.
सावेडीतील एकाच महिलेचे दोन रिपोर्ट पाहून नगरमधील प्रशासनाचा पुन्हा एकदा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. रविवारी (दि.16) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी सिव्हीलमध्ये स्वॅब दिला.
स्वॅब येण्यास विलंब होईल असे गृहीत धरून त्यांनी सोमवारी सकाळी खासगी लॅबमध्ये धाव घेतली. तेथे स्वॅब तपासणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. सकाळी बारा वाजता खासगी लॅबमधील रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.
त्यामुळे कुटूंबीयाने सुटकेचा श्वास घेतला होता. मात्र त्याच रात्री सिव्हीलच्या लॅबमधील रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला. एकाच महिलेचे दोन रिपोर्ट पाहून ती करोनाबाधित आहे की नाही यामुळे सारेच बुचकळ्यात पडले आहेत.
आता सिव्हीलचा रिपोर्ट खरा मानयाचा की खासगी लॅबचा असा प्रश्न तिच्यासमोर पडला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved