मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही.

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकारवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहिलेले नाही.

सरकारमध्ये फक्त संशय कल्लोळ सुरू असून सरकारचा रिमोटही दुसऱ्याच्या हातात आहे, अशी घणाघाती टीका भाजप नेते आणि माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

इंदोरीकर महाराजांची भेट घेतल्यानंतर आ. विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आ.विखे-पाटील म्हणाले, आघाडी सरकारने राज्यातील शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली असून राज्यातील सरकार फेकू सरकार आहे.

सरकारमध्ये कोणताही समन्वय नसून अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकारमधील मंत्री फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपले अपयश झाकत आहेत, असा आरोप केला.

कोरोना संकटातही राज्य सरकारकडून पाहिजे तशी निर्णय प्रक्रियेची अंमलबजावणी होवू शकली नाही. सरकारचे अपयश कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येत आहे.

या कोरोना संख्येमुळेच महाराष्ट्र सध्या प्रथम क्रमांकावर दिसतो. हे राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment