65 वर्षीय महिलेसह चिमुकलीला कोरोनाची बाधा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण भरमसाठ वाढत आहेत. संमनेर, श्रीरामपूर, पाथर्डी या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण जास्तप्रमाणात आढळले आहेत.

आता राहुरी तालुक्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. राहुरी शहरात दोन दिवसांपूर्वी एका व्यापार्‍याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्याच्या कुटुंबातील दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

राहुरी शहरातील बाधितांमध्ये त्या बाधिताची 65 वर्षीय आई आणि दीड वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे. सध्या या बाधितांच्या संपर्कात आलेल्या संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment