अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या दैठणे गुंजाळ येथील आठ संशयितांनी घशातील स्त्राव देण्यास नकार दिल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला.
यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी पोलिसांना पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीमध्ये तब्बल सहा रुग्ण एकाच दिवशी आढळल्याने एकच खळबळ उडाली.
या रुग्णांनी खासगी रुग्णालयात कोरोना चाचणी करून घेतली. अहवाल सोमवारी आला. दैठणे गुंजाळ व म्हसोबा झाप येथील प्रत्येकी दोन, पानोली व जवळा येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात सोमवारी एकूण १० रुग्णांची भर पडली.
या लोकांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या घशातील स्त्राव घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. दैठणे गुंजाळ येथील संपर्कातील ८ जणांनी घशातील स्त्राव देण्यास नकार दिल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला. समजावून सांगूनही न ऐकल्याने अखेर पोलिसांना पुढील कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा