अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणात होत आहे. एकीकडे प्रशासन आणि समाज या महामारीशी झुंज देत आहे तर दुसरीकडे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढीस लागल्याचे चित्र आहे.
नुकतेच एका युवकास पोलिसांनी गावठी कट्टा व तलवार विक्री करताना जेरबंद केले आहे. अकाश अण्णा फुलारी (वय- २२ रा . कासार पिंपळगाव ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा,

जिवंत काडतूस, दोन तलवारी, एक मोबाईल असा ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिशिरकुमार देशमुख,
पोलीस हवालदार मनोहर गोसावी आदींच्या पथकाने केली. जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाची परिस्थिती चिंताजनक असताना अशा गन्हेगारी प्रवृत्तीचे वाढते लोन समाजासाठी अहितकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून अशांवर मोठी कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved