अहमदनगर :- शहरातील सर्जेपुरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक आरिफ शेख व बसपचे नगरसेवक मुदस्सर शेख या दोघांच्या समर्थमकांमध्ये हाणामारी झाली आहे.
या परिसरातील आजी-माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांत हा वाद झाल्याचे सांगण्यात आले. या गटातील मारामारीचे कारण किरकोळ असल्याचे समजते.
पोलिसांनी या दगडफेकीची गंभीर दखल घेत सर्जेपुरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवला. सायंकाळी दगडफेक झाल्यामुळे परिसरात धावपळ उडाली.
बाजारपेठेच्या जवळचा भाग असल्याने आणि सायंकाळची वेळ असल्याने या भागात गर्दी होती. अचानक दगडफेक होऊ लागल्याने वाहनचालक, पादचारी सुसाट निघाले. काही जण यात जखमी झाल्याचे समजते.
महानगरपालिकेच्या निवडणुकीतील वादातून दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याचे बोलले जात आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आरिफ शेख व नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या समर्थकांमध्ये वाद झाला.
त्यातून एकमेंकाना मारहाण होऊन दगडफेक झाली. दगडफेकीमुळे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. तोफखाना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हारुण मुलानी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून दगडफेक करणार्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्याच्या आधारे हा शोध घेतला जात आहे.
या दगडफेकीमागे राजकीय वाद असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी दगडफेक करणार्यांची माहिती संकलित केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
- Shrirampur Breaking : हवेत गोळीबार आणि चाकूचे वार; श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण ! नागरिक घाबरले
- Tata Sierra 2025 : टाटा मोटर्सची धमाल ! Tata Sierra EV सादर, किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेट जाणून घ्या
- लग्न जुळेना, बाहेर जाण्यास बंदी, पाणी भरण्यापासून दळण दळण्यापर्यंत ! टक्कल पडलेल्या लोकांचे काय हाल होत आहेत ?
- टाटा पॉवर शेअरची झेप; ब्रोकिंग फर्मने दिली चकित करणारी टार्गेट प्राईस
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे मेट्रोच्या वेळेत झाला मोठा बदल