अहमदनगर :- कलात्मक व नाविन्यपूर्ण दागिने हा सर्वच महिलांचा जिव्हाळ्याचा विषय असून गेली पाच वर्ष परंपरा व आधुनिकता याचा मेळ घालणारे केएनजे ज्वेलर्सचे दागिन्याचे प्रदर्शन नगरकरासाठी पर्वणी असल्याचे मत सौ. धनश्री विखे यांनी व्यक्त केले.
केशवलाल नथूभाई ज्वेलर्स (केएनजे ) नाशिक तर्फे चोरडिया परिवार मस्तानी ग्रुप सहकार्याने आयरिश हॉटेलमध्ये आयोजित ज्वेलरी प्रदर्शनाचे उद्घाटन सौ.धनश्री विखे व पारनेर पंचायत समिती माजी सभापती सौ.जयश्री औटी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बडी साजन ओसवाल श्री.संघचे विलास लोढा,केएनजे ज्वेलर्सचे श्रेणिक सराफ, मधुबाला चोरडिया,नरेंद्र चोरडिया व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सौ.जयश्री औटी म्हणाल्या कि, आजच्या महिला व युवती दागिन्यांच्या बाबतीत अतिशय जागृत असून ,त्यांना या ठिकाणी उत्तम ज्वेलरी उपलब्ध आहे,खरे तर आता केएनजे ज्वेलर्सने नगर मध्ये शाखा सुरु करून कायमस्वरूपी नगरकरांना सेवा द्यावी.
अमेरिकेत ज्वेलरी डिझाईनचे प्रशिक्षण घेतलेले केएनजे ज्वेलर्सचे श्रेणिक म्हणाले कि, नगरला दरवर्षी उत्तम प्रतिसाद मिळतो.या ठिकाणी सोन्या चांदीच्या दागिन्या बरोबरच डायमंड व अनकट डायमंडच्या आधुनिक डिझाईनच्या ज्वेलरी उपलब्ध आहेत. तीन दिवस हॉटेल आयरिश मध्ये सुरु असलेल्या या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रदर्शन कार्यक्रमास इनरव्हील क्लब डीस्ट्रीक चेअरमन सायली खानदेशे, नगर चेअरमन वैजयंती जोशी,सौ. प्रतिभा धूत,रोषण चोरडिया व विविध क्षेत्रातिल मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रुचा तांदूळवाडकर यांनी केले तर आभार सौ. मधुबाला चोरडिया यांनी मानले. प्रदर्शन मंगळवार पर्यंत हॉटेल आयरिश मध्ये सुरु असणार आहे.
- Supreme Court Bharti 2025: भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 रिक्त जागांसाठी भरती सुरू; करा
- एसबीआयच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करा आणि कोटीत परतावा मिळवा ‘
- सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता! तूर डाळीचे दर गडगडले; प्रतिकिलो ‘इतकी’ झाली स्वस्त
- 1 लाखपेक्षा जास्त किंमत असलेली टीव्हीएसची ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर 86 हजार रुपयांना खरेदी करण्याची संधी! या ठिकाणी मिळेल भन्नाट डील
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?