शहरातील आधार केंद्रांवर छापे, बनावट बोटांचे ठसे आढळले

Ahmednagarlive24
Published:

नगर –
नगर शहरातील आधार केंद्र चालकांवर तहसीलच्या पथकाने छापे टाकले. बनावट बोटांचे ठसे असलेल्या प्रिंट जप्त करण्यात आले असून संबंधित केंद्रचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील आधार केंद्र चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. 

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आलेल्या तक्रारींनुसार आधार केंद्रांवर कारवाई झाली. आधार केंद्रांची झडती घेऊन फिंगरप्रिंट जप्त करण्यात आल्या. बायोमेट्रिक माहितीचा अशा प्रकारे दुरुपयोग करणे चुकीचे असल्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले. 

राज एंटरप्राइजेस सावित्रीबाई फुले व्यापारी संकुल, टीव्ही सेंटर आकाशवाणी चौक, सावेडी येथे छापे टाकण्यात आले. सावेडी येथील इरफान गोल्डन टच या महा-ई-सेवा केंद्राचीही पाहणी करण्यात आली. 

ही कारवाई तहसीलदार उमेश पाटील, निवासी नायब तहसीलदार बारवकर, सावेडी मंडलाधिकारी, तलाठी देशपांडे यांनी केली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment