अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : सर्व वर्गाच्या पाठोपाठ अंतिम वर्षाच्या वर्गाच्या परीक्षा देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे.
परंतु परीक्षांचे शुल्क विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी आगोदरच जमा केलेले आहे. हे शुल्क मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग करावे, अशी मागणी राहुल मते यांनी केली आहे.
सध्या अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे राज्यसरकार खुप मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहे आगामी काळात आरोग्यसुविधेलाअधिकतम महत्व देऊन
आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य सरकार देखील पावले उचलत आहे आणि म्हणुनच या पार्श्वभूमीवर आम्हीही समाजाचे काहीतरी देणे लागतो
या हेतूने मनामधे संकुचित वृत्ती न ठेवता आम्ही शेतकरी विद्यार्थ्यांनी भरलेली परिक्षा फी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधे वर्ग केल्यास विद्यार्थ्यांना निकालपत्र घेताना आनंद वाटेल, असे मते यांनी निवेदनात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews