अहमदनगर :- साकळाई पाणी योजनेची मागणी २५ वर्षांपूर्वीची आहे. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त खेळवण्याचे काम केले. अनेक जुने प्रश्न आम्ही सोडवले.
साकळाईचा प्रश्नही सोडवू. कोणाच्याही वाट्याचे पाणी कमी न करता साकळाईला पाणी उपलब्ध होईल.

विधानसभा निवडणुकीपूर्वी नगर आणि श्रीगोंद्याच्या जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेला मंजुरी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकी येथील प्रचारसभेत मंगळवारी दिले.
भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे,
बबनराव पाचपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, शिवसेनेचे राजू भगत,
काँग्रेसचे बाळासाहेब हराळ, सुवेंद्र गांधी, अभिनेत्री दीपाली सय्यद, आरपीआयचे सुनील साळवे या वेळी उपस्थित होते.
बोगदा तयार करून कुकडी प्रकल्पात ५ टीएमसी अतिरिक्त पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून साकळाईला पाणी देण्यात येईल.
सौरऊर्जेचा वापर करण्यात येईल. त्यामुळे वीजबिलाला प्रश्न सुटेल. डॉ. विखे यांची ओळख आता वॉटरमन म्हणून तयार झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
- Gold Rate Prediction: काय म्हणता! सोन्याचे दर 1 तोळ्याला 140000 हजार होतील? काय आहेत कारणे?
- CIBIL Score: कर्जासाठी आता नाही लागणार सिबिल स्कोर? पहा केंद्र सरकारने काय केला खुलासा?
- Stock Split: ‘ही’ स्मॉल कॅप कंपनी करणार स्टॉक स्प्लिट! 1 शेअरचे होणार 10 शेअर्समध्ये विभाजन…गुंतवणूकदारांना होणार का फायदा?
- Multibagger Stocks: गुंतवणूकदार झाले मालामाल! ‘या’ शेअर्सने दिला 6 दिवसात 49% परतावा… तुमच्याकडे आहे का?
- Sun Pharma Share Price: सन फार्मा शेअरमध्ये 12.80% ची उसळी! SELL करावा का? बघा माहिती