अहमदनगर :- गेल्या तीन दिवसांपासून नगरमध्ये किमान तापमान ८ ते ९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदले जात आहे, तर कमाल तापमान २८ ते ३० च्या दरम्यान आहे.
उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गेल्या दोन-तीन दिवसांपासून नगरमध्ये गारठा चांगलाच जाणवत आहे. हवामान ढगाळ असल्याने सूर्यप्रकाशही कमी पडत असल्याने दिवसभर थंडी जाणवत आहे.

File Photo
आणखी एक-दोन दिवस थंडी राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. सध्या झोंबणारे वारे वाहत असल्याने हवेत चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. आकाश झाकोळलेले असल्याने सूर्यर्दशन होत नाही. दुपारनंतर उन पडले तरी तीव्रता कमी असल्याने थंडी जाणवत आहे.
त्यामुळे घराबाहेर पडल्यावर, प्रवास करताना चांगलाच गारठा जाणवत आहे. उत्तरकडून वाहणारे थंड वारे आणि अलीकडेच विदर्भात झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे थंड वारे वाहत असल्याचे सांगण्यात येते.