कोरोनाला थांबवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज’

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :-  प्रत्येकाने मानवतेच्या भावनेतून कोरोना रुग्णांची सेवा करावी. कोरोना विषाणू असल्यामुळे नागरिकांत मोठ्या प्रमाणात फैलावत आहे.

नगर शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या रोगाला थांबवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

स्टेशन रोडवरील साईनाथ कोविड सेंटरतर्फे लक्षणे असणाऱ्यांसाठी २१ बेडचे कोविड सेंटरचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते झाले.

यावेळी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, प्रकाश भागानगरे, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. रोहित करांडे, डॉ. तुषार कोहक, डॉ. बाळासाहेब गाडे, डॉ. वैभव गाडे, डॉ. गणेश गोपनर उपस्थित होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment