दिलासादायक’ बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. यातच उत्तरेकडील भागांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त असल्याचे दिसून आले आहे.

बिबट्याने अनेक दिवसांपासून मानवी वस्तीवर हल्ले चढवत अनेकांचे प्राण घेतले आहे तर काहीना गंभीर जखमी केले आहे. दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

नेवासा तालुक्यातील चांद्याजवळील रस्तापूर शिवारात वन विभागाने लावलेल्या पिंजर्‍यात रात्री एक बिबट्या अडकला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, अमृत बन्सीलाल मुथ्था यांच्या शेता जवळील परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने वन विभागाने संबंधित परिसरात पिंजरा लावला होता.

पिंजर्‍यात बिबट्याला भक्ष्य म्हणून एक शेळी ठेवण्यात आली होती. भक्षाच्या शोधार्थ या ठिकाणी आलेला बिबट्या अलगत पिंजर्‍यात अडकला.

हि माहिती समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी चांदा गावचे पोलीस पाटील कैलास अभिनव तसेच रस्तापूरचे सरपंच वसंत उकिर्डे यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जेरबंद बिबट्याला तेथून तातडीने हलविले.