अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोना पाठोपाठ आता म्युकोरमायकॉसिस या आजाराने शिरकाव केला आहे. दरम्यान नुकतेच या आजाराचे नऊ रुग्ण श्रीरामपूरमध्ये आढळून आले आहे.
यापैकी एका रुग्णावर श्रीरामपुरात यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी सांगितले.
आजच्या स्थितीत श्रीरामपुरात म्युकोरमायकॉसिस आजाराचे नऊ रुग्णांचे निदान झाले आहे. यातील काही रुग्णांवर नगर, औरंगाबाद व नाशिक येथे उपचार सुरू आहेत.
यापैकी ज्या रुग्णाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे, अशा एका रुग्णाची श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान या रुग्णावर डॉ.प्रणवकुमार ठाकूर, डॉ.गणेश जोशी, डॉ.शरद सातपुते, डॉ.ऋतुजा जगधने यांनी ही शस्त्रक्रिया केली असून ती यशस्वी झाली आहे.
सद्यस्थितीत या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती साखर कामगार रुग्णालयाचे डॉ.रवींद्र जगधने यांनी दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम