अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- देशासमोर कोरोनाचे संकट उभे आहे. यातच आता हवामान खात्याने जो इशारा दिला आहे ते पाहून देशाची चिंता वाढली आहे.
हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार आज संध्याकाळी (16 मे)बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ वादळ येण्याची शक्यता आहे.
ज्यामुळे अंदमान निकोबार, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो. या चक्रीवादळाच्या परिणामामुळे देशातील आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहू शकतात.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तसेच पंजाब, हरियाणा, उत्तर राजस्थान आणि पश्चिम उत्तर प्रदेश यासारख्या देशात डोंगराळ प्रदेशातील हवामान खराब होऊ शकतं.
हवामान खात्याने या राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आणि सावध राहून घराबाहेर पडू नये असा इशारा लोकांना देण्यात आला आहे.
तसेच अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात, मंगळवारी किनारपट्टीच्या ओडिशाच्या काही भागांत आणि पुढील आठवड्यात बुधवारी पश्चिम बंगालमधील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी आणि शनिवारी वादळी वाऱ्यासह दिल्ली आणि आसपासच्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळ वादळाच्या वातावरणाबाबतही अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात पुढील 2-3 दिवस मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com