काँग्रेस आघाडीचे सरकार आले, तर सर्वात आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी !

Ahmednagarlive24
Published:

झारखंड :- केंद्रातील मोदी सरकार हे मूठभर भांडवलदारांसाठी काम करत असल्याची जोरदार टीका पुन्हा एकदा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी झारखंडमधील सभेत बोलताना केली.

त्याचबरोबर राज्यात जर काँग्रेस आघाडीचे सरकार आले, तर सर्वात पहिले शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीला जिंकून देण्याचे आवाहन करत, राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

आघाडीतील झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमेदवाराच्या प्रचार सभेमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी, केंद्रातील मोदी सरकार हे देशातील फक्त १५ ते २० भांडवलदारांसाठी काम करत असल्याचा आरोप लावला. मोदी सरकार गरिबांचा पैसा घेऊन अंबानी व अदाणीसारख्यांचे घर भरत आहे.

झारखंडमधील आदिवासींची जमीन ओरबाडून ती उद्योगपतींच्या घशात घालण्याचे काम केले जात आहे. मात्र, काँग्रेस असे होऊ देणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. जर राज्यात आपले सरकार आले तर सर्वात प्रथम शेतकऱ्यांचे दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, असे आश्वासन सुद्घा त्यांनी यावेळी दिले.

मोदी सरकारच्या नोटबंदी व जीएसटीसारख्या निर्णयांवर देखील राहुल गांधी यांनी टीका केली. या दोन्ही गोष्टींमुळे लहान उद्योग व व्यापारी देशोधडीला लागले, तर अनेक जण बेरोजगार झाल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment