अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे रविवारी सायंकाळी नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या ३४ वर्षांचा तरुणाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला.दरम्यान, घशातील स्त्रावाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
मुंबईतील हॉटस्पॉट असलेल्या घाटकोपर येथून हा तरुण, त्याची पत्नी, भाऊ व भावजय तीन दिवसांपूर्वी दरोडी येथे आले. स्थानिक समितीने चौघांनाही संस्थात्मक क्वारंटाइन करून जिल्हा परिषदेच्या शाळेत ठेवले होते.
दोघा भावांपैकी धाकट्यास रविवारी सायंकाळी श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यात आला. पारनेर येथे आणल्यानंतर प्राथमिक तपासणी करण्यात आली.
सारीसदृश लक्षणे आढळल्याने तत्काळ नगर येथे हलवण्यात आले. उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. घशातील स्त्रावाचे नमुने पुण्यात तपासणीसाठी पाठवण्यात आले.
मृतदेह शासकीय रुग्णालयातच ठेवण्यात आला असून प्रयोगशाळेच्या अहवालानंतर तो नातेवाईकांकडे द्यायचा निर्णय घेण्यात येणार होता. अहवाल निगेटिव्ह आल्याने चिंतेचे कारण राहिले नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com