नेवासा : नगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या कंटेनर-कार अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाला आहे.
विठ्ठल पांडुरंग कौसे (वय ३२, रा.कावलगाव, ता.पूर्णा, जि. परभणी) हे अपघातात मृत झाले, तर अनिल सखाराम पारसकर (निगडी, ता.मावळ, जि.पुणे) हे जखमी झाले आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारसकर व कौसे हे स्वीप्ट कारमधून मंगळवारी नांदेड येथून पुण्याकडे निघाले होते.
बुधवारी रात्री दोनच्या सुमारास औरंगाबाद येथून पुण्याकडे जात असताना देवगड फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला कंटेनरच्या मागील बाजूस कुठल्याही प्रकारचे इंडिकेटर नसल्याने कार कंटेनरवर आदळली.
यावेळी मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला राहणारे नागरिक त्वरित घटनास्थळी येऊन दोघांना कारमधून बाहेर काढले.
मात्र चालक विठ्ठल कौसे हा जागीच ठार झाला. तर जखमी अनिल पारसकर यांना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
- 200MP कॅमेरा + 7600mAh बॅटरी! iQOO 15R चार वर्षे अगदी नवा राहणारा फोन !
- 7000mAh बॅटरी, 50MP ट्रिपल कॅमेरा, 100W फास्ट चार्जिंग, iQOO 15 वर धमाकेदार डिस्काउंट
- रेल्वेसाठी मोठा पॅकेज, वंदे भारत स्लीपर ट्रेनसह अमृत भारत रेल्वेचा विस्तार
- विजय सेल्समध्ये iPhone 16 आता अर्ध्या किमतीत-Limited Offer, एक्सचेंज आणि बँक डिस्काउंटसह उपलब्ध
- साध्या लोकलचे एसी लोकलमध्ये रूपांतर; तिकीट दर किती? आराखड्यासाठी आयआयटीची नियुक्ती













