कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शहरातील ‘या’ ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 जुलै 2020 :-नगर शहरातील भराडगल्ली परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर या परिसरात २८ जुलैपर्यंत कंटेन्मेंट झाेन महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी घोषित केला आहे.

तोफखाना परिसरातील भराडगल्ली भागात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या परिसरातून फैलाव रोखण्यासाठी कंटेन्मेंट झाेन घोषित करण्यात आला.

भराडगल्ली, आर्यकुमार व्यायामशाळा, बेंद्रे ज्वेलर्स कोपरा, बिटला घर, हर्षल शेकटकर घर, भय्या परदेशी घर, सुजित हराळे घर, शिवरात्री दुकान हा परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये आहे.

तोफखाना परिसर, गंगा अपार्टमेंट, मेहसुनी टेलर परिसर, भैरवनाथ मंदिर परिसर, छाया टॉकीज, नेहरू मार्केट, चितळेरोड परिसर बफर झोनमध्ये आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment